गुलाबी बोंडअळी विषयी जनजागृती करणार चित्ररथ  
मुख्य बातम्या

गुलाबी बोंडअळी विषयी जनजागृती करणार चित्ररथ 

शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

टीम अॅग्रोवन

नागपूर : शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनजागृती चित्ररथाला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडा दाखवून मार्गस्थ केले. गुलाबी बोंडअळीचे निमूर्लन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून अंकुर सीड्स कंपनीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ‘गुलाबी बोंडअळी निर्मुलन प्रचार रथ’ जनजागृती मोहिमेचा या वेळी प्रारंभ झाला.

हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक तालुक्यात फिरून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे तसेच अंकुर सीड्स कंपनीचे प्रतिनिधी सुरेश ढोके, अमोल शिरसाठ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक निर्मूलन करण्यासाठी तसेच पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करण्याचे गरजेचे आहे. यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. तसेच डिसेंबर-जानेवारी दरम्यान कपाशीचे पीक पूर्णपणे काढून टाकावे. नंतर खोडवा (फरदड) घेऊ नये. यामुळे गुलाबी बोंडअळीची शृंखला तुटण्यास मदत होते.

कपाशीचे वेचणी झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पऱ्हाट्या आणि इतर पाला-पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. कापूस मील व व्यापार संकुलाच्या ठिकाणी जेथे कपाशीचा व्यापार होतो व साठवणूक होते, अशा ठिकाणी प्रकाश व कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग वेळो वेळी नष्ट करावेत. तसेच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जिथे दिसून आला त्या ठिकाणी कृषी

विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी. फवारणी करताना कीटकनाशकांसोबत दिलेली आतील माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे. फवारणी करताना संरक्षक पोशाख, बूट, हातमोजे, मास्क इत्यादींचा वापर करणे बंधनकारक असल्याची माहिती शेंडे यांनी यावेळी दिली.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT