कृषिमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे? तूर्त प्रभारी मुख्यमंत्री..!
कृषिमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे? तूर्त प्रभारी मुख्यमंत्री..! 
मुख्य बातम्या

कृषिमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे? तूर्त प्रभारी मुख्यमंत्री..!

टीम अॅग्रोवन

नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा दिवसांसाठी विदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांनी मुख्यमंत्रीसह कृषिमंत्री पदाचा प्रभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगीतले. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाला विशेष भेट मिळाल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून चर्चीले जात आहे.  शनिवार (ता.१६) पर्यंत चंद्रकांत पाटील प्रभारी मुख्यमंत्री राहतील. परंतु कृषिमंत्रीपद त्यांना प्रभारी नाही, तर कायमचेच मिळणार असल्याचे सांगीतले जात आहे. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधनानंतर या पदी सक्षम नेत्याचा शोध सुुरू होता. दादांवर हा शोध संपल्याचे बोलले जात आहे. चार जुलैपासून नागपूरला पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनात कर्जमाफी, बोंड अळीची मदत, अवैध बियाणे, पीककर्ज वितरणातील अनियमितता अशा कृषी विषयक मुद्यांवर विरोधकांकडून घेराबंदीची शक्‍यता पाहता; चंद्रकांत पाटील यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचेही सूत्र सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Cultivation : नियोजन हळद लागवडीचे...

Soybean Varieties : मध्य भारतासाठी प्रसारित वैशिष्ट्यपूर्ण सोयाबीन वाण

Chana Market : हरभऱ्यातील तेजीची कारणे काय?

Agriculture Commodity Market : हळद, तूर, मक्याच्या भावात वाढ

Onion Rate : कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न; केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून सरकारचं कौतुक!

SCROLL FOR NEXT