खानदेश, मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

खानदेश, मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता

चालू आठवड्यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : ऑगस्ट महिन्यात गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तर चालू आठवड्यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गेले दोन महिने पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पश्‍चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात १६ ऑगस्टनंतर चांगला पाऊस पडला. तर पूर्व विदर्भ, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात २० ते २६ ऑगस्ट दरम्यान राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहणार आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दुसऱ्या आठवड्यात २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातही या काळात पूर्व मराठवाडा व लगतच्या पश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

गेल्या दोन आठवड्यांत पावसाच्या दडीने राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. निरभ्र आकाशामुळे उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी तापमान ३३ ते ३६ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने, व ढगाळ हवामानामुळे बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान पुन्हा ३० अंशांच्या खाली आले आहे. 

पुढील आठवड्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक, तर उर्वरित राज्यात सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागांत किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

येथे होणार पाऊस  रविवार ः संपूर्ण राज्यात तुरळक सरी सोमवार ः संपूर्ण राज्यात तुरळक सरी मंगळवार ः संपूर्ण राज्यात तुरळक सरी बुधवार ः संपूर्ण राज्यात तुरळक सरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT