The challenge of selling sugar in the domestic market 
मुख्य बातम्या

देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हान

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबरचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत एक लाख टनाने साखर कोटा कमी आहे.

Raj Chougule

कोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबरचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत एक लाख टनाने साखर कोटा कमी आहे.

३० नोव्हेंबरला जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अन्न मंत्रालयाने डिसेंबर २०२१ साठी देशभरातील ५५८ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २१.५० लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे. या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी कोटा मंजूर करण्यात आला. अन्न मंत्रालयाने नोव्हेंबर महिन्यासाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा मंजूर केला होता. डिसेंबर २०२०च्या तुलनेत या महिन्यात समान कोटा मंजूर केला. डिसेंबर २०२० मध्येही २१.५० लाख टन साखर विक्रीस परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, देशांतर्गत बाजारात साखरेची घसरण कायम आहे. यंदाचा  हंगाम सुरू झाल्यापासून क्विंटलला सरासरी दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण देशांतर्गत बाजारात झाली. याचा फटका साखर कारखान्यांना साखर विक्री करताना बसत आहेत. सध्या देशांतर्गत बाजारात ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल इतका दर कारखान्यास मिळत आहे.

हंगाम सुरू होण्यापूर्वी हेच दर ३६०० रुपयांपर्यंत गेले होते. दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात साखर विक्री झाल्याने आता देशांतर्गत बाजारपेठेतून साखरेची मागणी कमी झाली आहे. यातच यंदाच्या हंगामातील नवी साखर बाजारात येत असल्याने साखरेचे दर दिवसेंदिवस खाली येत असल्याचे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्र व कर्नाटकातून साखरेच्या उत्पादनाची गती अधिक आहे. २९ नोव्हेंबरअखेर एकट्या महाराष्ट्रातून १९ लाख टन साखर तयार झाली. उत्पादनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश काही प्रमाणात मागे असला तरी उत्तर प्रदेशची कसर महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्ये भरून काढत असल्याने यंदाही साखरेचे मुबलक उत्पादन होईल, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. 

साखरनिर्यातीला चालना देण्याची अपेक्षा अनेक ठिकाणी किमान विक्री मूल्य दरापर्यंत साखरेचे दर खाली आहेत. गेल्या काही दिवसांत देशांतर्गत दर व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर एका समान पातळीत आल्याने साखर निर्यातीस कारखाने चालना देतील, अशी अपेक्षा साखर उद्योगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT