केंद्राने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत  The Center should reverse anti-farmer decisions
केंद्राने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत  The Center should reverse anti-farmer decisions 
मुख्य बातम्या

केंद्राने शेतकरीविरोधी निर्णय मागे घ्यावेत 

टीम अॅग्रोवन

उजनी. जि. लातूर: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचा प्रश्न अजून मार्गी लागला नसताना केंद्र शासनाने नुकतेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातील आणखी तीन निर्णय घेतल्याने या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने येथील शेतकऱ्यांची पोरं संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करणारे जवळपास चार हजार पाचशे निवेदने गोळा केली आहेत. मंगळवारी (ता.१२) संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ती निवेदने दिल्लीतील कृषी मंत्रालयात दाखल केली.  केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारपेठेत येण्याच्या वेळेस सोयाबीन पेंड आयातीस परवानगी दिली. त्यासोबतच सोयातेलवरील आयात शुल्कही कमी केले. तसेच आता सोयाबीन साठवणुकीवर मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव ११ हजारांवरून पाच हजारांवर आले आहेत. सगळीकडे सोयाबीनचा तुटवडा असताना या वेळी तरी शेतीमालाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु त्या आधीच सरकारने व्यापारी हित जोपासणारे निर्णय घेतले. सोयाबीनचे दर चांगले असतानाही त्याचा व्यापाऱ्यांनाच फायदा झाला. केंद्र शासनाच्या अशा चुकीच्या धोरणांचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे, असा आरोप करून मोदी सरकारने आपले हे तीन निर्णय मागे घ्यावेत, यासाठी येथील शेतकऱ्याची पोरं संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांच्या पुढाकाराने उजनी (ता. औसा) परिसरातील एकंबी, गुळखेडा, आंदोरा, वडजी, जायफळ, चिंचोली आदी गावांतून शेतकऱ्यांकडून निवेदने गोळा करण्यात आली होती. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे खासगी सचिव मुकेश कुमार बन्सल यांची भेट घेऊन तब्बल साडेचार हजार निवेदने त्यांना सादर करण्यात आली. संबंधित निर्णय मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT