शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू 
शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू  
मुख्य बातम्या

शिरसमणी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू 

टीम अॅग्रोवन

पारोळा, जि. जळगाव  ः शिरसमणी (ता. पारोळा) येथे धोंडू लोटन भोसले यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाला. नुकतीच ही घटना घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.  गेल्या दोन- तीन दिवसांपासून शिरसमणी येथील सुधाकरनगर शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. शेतकरी धोंडू भोसले हे शेतात गेले होते. या वेळी बिबट्या वासराला उचलून नेत असताना त्यांना दिसले. ते घराकडे धावत निघाले. त्यांनी ही माहिती आपल्या गावात सांगितली. परिसरात कॅमेरे बसवले जातील, असे वन विभागाने म्हटले आहे, परंतु ही कार्यवाही लवकर करण्याची मागणीदेखील केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून आजूबाजूला प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात गाई, म्हशी, बैल, वासरू असे पशुधन आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. संतोष महाजन, किशोर पाटील, लोटन बाविस्कर, नितीन देवरे, अनिल पाटील, दत्तू पाटील, जगदीश पाटील, निरंजन पाटील, भीमराव बंजारी यांच्यासह ग्रामस्थांनी परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT