बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून केबलचोरी
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून केबलचोरी 
मुख्य बातम्या

बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून केबलचोरी

सकाळ वृत्तसेवा

आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. रात्रीच काय पण दिवसाही ग्रामस्थ शेतात जायला नको म्हणतात. याचा फायदा चोरटे घेत असून येथील सुधा नदीसह विहिरींवरील वीजपंपांच्या केबल चोरून नेल्या जात आहेत. येथील टेमगिरे वस्ती परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ घराबाहेर पडत नाहीत, याचा फायदा घेत चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल लांबविल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांत सहा ते सात शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. दरम्यान, या चोऱ्या आणि भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील विजय घनवट, अमोल झिंजुरके यांनी चाकण येथे वनाधिकाऱ्यांची भेट घेऊन या   भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT