Buy mangoes from GI holders 
मुख्य बातम्या

'जीआय'धारकांकडून आंबा खरेदी करावा : देवगड हापूस उत्पादक सहकारी संस्था

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग : येत्या हापूस हंगामात अधिकाधिक ग्राहकांनी जीआयधारकांकडूनच आंबा खरेदी करावा, यासाठी जनजागृतीद्वारे आवाहन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत उच्च प्रतीचा आणि प्रतवारी केलेला आंबा ग्राहकांना देण्यावरदेखील सकारात्मक चर्चा झाली.

देवगड तालुका हापूस उत्पादक सहकारी संस्थांद्वारे जीआयधारक आंबा बागायतदारांची सभा आयोजित करण्यात आली. ॲड. अजित गोगटे, जीआय सल्लागार ओंकार सप्रे, विद्याधर जोशी, राजू पाटील, बाबू लाड, श्रीधर कुळकर्णी, आनंद साटम, विजू पाटील आदी उपस्थित होते.

देवगड हापूसच्या नावाखाली इतर राज्यातील आंबा खपविण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्यामुळे यावर्षी देवगड हापूस उत्पादक संघाने आंबा उत्पादकांनी जीआय नोंदणी करावी, यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या आवाहनानुसार, अनेक बागायतदारांनी जीआय नोंदणी केली आहे. दरम्यान, येत्या हंगामात जीआयधारकांकडून अधिकाधिक ग्राहकांनी आंबा खरेदी करावा, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

आंबा उत्पादकांनी ग्राहकांना उच्च प्रतीचा आणि प्रतवारी केलेला आंबा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वच उत्पादकांनी सहमती दर्शविली. याशिवाय जीआयधारकांकडून आंबा खरेदी करण्यासाठी तालुक्यातील मोक्याचा ठिकाणी ग्राहकांच्या माहितीसाठी फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जीआय नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करा

इतर आंबा उत्पादकांना जीआय नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करावे, आंबा खरेदी-विक्रीची नोंद वहीत करावी, जीआय लोगोचा वापर विक्री खोक्यावर करावा, फळबाजारातील अडते, व्यापाऱ्यांना जीआय घेण्यासंदर्भात बाजारसमितीचे पत्र द्यावे, याविषयीदेखील निर्णय घेण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT