dada bhuse
dada bhuse  
मुख्य बातम्या

रोपवाटिकेमुळे व्यवसायाच्या संधी ः दादा  भुसे 

टीम अॅग्रोवन

मालेगाव, जि. नाशिक : राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार तसेच कीड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू करण्यात येत आहे. याच रोपवाटिका शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतील, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. कृषिमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सातमाने (ता. मालेगाव) येथे शनिवारी (ता.७) भाजीपाला रोपवाटिका भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे, सेवानिवृत्त कर्नल अमित दळवी, दिलीप हिरे, लोटन शेवाळे, प्रगतिशील शेतकरी प्रमोद निकम, निळकंठ निकम, दीपक देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले, की राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. किमान एक लक्षांक प्रत्येक तालुक्यास देण्यात आला आहे. भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड-रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, हे उद्देश असून ते नक्कीच साध्य होईल, असा विश्‍वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

Agrowon Podcast : कांदा भाव दबावातच; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे दर काय आहेत?

Water Crisis : भूजल पातळी खालावल्याने गिरणा पट्ट्यात जलसंकट

Remuneration of Salgadi : अक्षय तृतीयेला ठरणार सालगड्यांचा मोबदला

SCROLL FOR NEXT