धामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार Bogus in Dhamangaon taluka Black market of Bt seeds
धामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार Bogus in Dhamangaon taluka Black market of Bt seeds 
मुख्य बातम्या

धामणगाव तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांचा काळाबाजार

टीम अॅग्रोवन

धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : गोपनीय माहितीच्या आधारे अमरावती येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील पथकाने कुऱ्हा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तालुक्यातील अंजनसिंगी येथे १ हजार ८८७ एचटीबीटीचे पाकीट (किंमत अंदाजे १३ लाख रुपये) जप्त केले. कृषी विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तिवसा तालुक्यातील दुर्गवाडा येथील सतीश ठाकरे याला फोन करून बियाणे घ्यायचे आहे, म्हणून कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचला. बोगस बियाणे घेऊन सतीश ठाकरे हा नियोजित ठिकाणी आला. या वेळी कुऱ्हा पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. सतीश ठाकरे याची चौकशी केली असता, सदर बियाणे अंजनसिंगी येथील प्रमोद देवघरे यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यावर कृषी विभागाच्या पथकाने व पोलिसांनी प्रमोद देवघरे याचे अंजनसिंगी येथील घर गाठले. प्रमोद देवघरे बाहेरगावी गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले. घराची झाडाझडती घेतली असता १ हजार ८८७ बियाणांचे पाकीट आढळून आहे. सदर बियाणे पाकीट जप्त करण्यात आले असून, कुऱ्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सतीश ठाकरे (वय ३०) याला अटक केली असून, प्रमोद देवघरे फरार आहे. सदरची कारवाई बियाणे निरीक्षक दादासाहेब पवार, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक उज्वल आगरकर, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी अनंत मसकरे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अजय तळेगावकर, कुऱ्हा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेश जोशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अढावू, पोलिस कर्मचारी करिश्मा बंड, विलास ढोले, आम्रपाली कांबळे, ज्योती धांडे यांच्या पथकाने केली.

५० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड आतापर्यंत लागवड क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के कापसाची लागवड झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांचा बीटी कपाशीकडे चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी कल राहतो. परंतु त्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बियाणे निम्म्या किमतीत मिळते. पण, अशा बियाण्यांना शासनाने विकण्याची परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, बियाणे तसेच, कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नसतो. तरीही या बीटीची काही वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. मागील वर्षी कृषी विभागाने काही विक्रेत्यांवर थातुरमातुर कारवाई केली असली, तरी या वर्षी मात्र या बोगस बियाण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व प्रकारात गरीब शेतकरी मात्र नाहक भरडला जातो.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT