black wheat  
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात पिकणार काळा गहू

जिल्ह्यात विविध पिकांबरोबर आता काळा गहू पिकणार आहे. महाबळेश्वरसह विविध तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण उपक्रमातून काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा ः जिल्ह्यात विविध पिकांबरोबर आता काळा गहू पिकणार आहे. महाबळेश्वरसह विविध तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण उपक्रमातून काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. यामुळे पुढील काळात काळ्या गव्हाची चव चाखता येणार आहे.  सातारा जिल्ह्यात प्रथमच क्षेत्र महाबळेश्वरसह जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण असा काळा गहू पिकवला जाणार आहे. नुकतेच महाबळेश्वर येथील प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे यांच्या शेतावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांच्या हस्ते काळ्या गव्हाची म्हणजे ‘एनबीएमजी’ या वाणाची नुकतीच पेरणी करण्यात आली. या वेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते.  कृषी सहायक दीपक बोर्डे यांनी काळ्या गव्हाचे बियाणे महाबळेश्वर, तसेच सातारा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुण दिले आहे. कृषी सहायक बोर्डे हे नेहमीच शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीविषयी प्रेरित करतात. नुकतेच त्यांनी काश्मिरी केशरची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. त्यांच्याच प्रयत्नातून महाबळेश्वरला काळ्या गव्हाची लागवड होत आहे. महाबळेश्वर तालुक्‍यामध्ये पूर्वीपासून गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; परंतु वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे गव्हाखालील क्षेत्र कमी होत गेले. या नवीन गव्हाच्या वाणामुळे महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांना नवीन पौष्टिक अशा काळ्या गव्हाच्या चपातीचा, पोळीचा आस्वाद घेता येणार आहे. या नवीन वाणाची महाबळेश्वरसह इतर तालुक्यांत दहा एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.  काळ्या गव्हाच्या वाणाचे संशोधन मोहाली येथील ‘एनएबीआय' या संशोधन केंद्रातील मोनिका गर्गे यांनी केले आहे. मोहाली परिसरातील शेतकऱ्यांकडून हा वाण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पौष्टिक गव्हाची मागणी वाढून जास्तीतजास्त शेतकरी काळ्या गव्हाच्या लागवडीकडे वळतील व शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न यामधून मिळेल, असे कृषी सहायक श्री. बोर्डे यांनी सांगितले.

ताण- तणाव, मधुमेह, लठ्ठपणासाठी गुणकारी  काळा गहू हा अतिशय पौष्टिक आहे. त्यात मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आदी अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून येते, तसेच भरपूर प्रमाणात अँटी ऑक्‍सिडन्ट, अँथोसायनिन घटक या काळ्या गव्हात असल्यामुळे ताण तणाव, मधुमेह, लठ्ठपणा, इतर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT