राष्ट्रमाता जिजाऊ यांना लाखोंनी केले अभिवादन
राष्ट्रमाता जिजाऊ यांना लाखोंनी केले अभिवादन 
मुख्य बातम्या

राष्ट्रमाता जिजाऊ यांना लाखोंनी केले अभिवादन

टीम अॅग्रोवन

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा (प्रतिनिधी) ः राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरी राज्यासह देशभरातून आलेल्या जिजाऊभक्तांनी फुलून गेली होती. राष्ट्रमातेला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येतील जनसमुदायाने सिंदखेडराजा नगरीतील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात हजेरी लावली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडून राष्ट्रमाता जिजाऊ यांना राजवाड्यातील जन्मस्थळी अभिवादन केले. राजमाता जिजाऊ यांना पुष्पहार घालून पूजा केली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार तोताराम कायंदे, नगराध्यक्ष ॲड. नाझेर काझी, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे, विनोद वाघ आदींसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

विविध मान्यवरांकडून अभिवादन राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथे अभिवादन केले. छत्रपती संभाजी महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार राहुल बोंद्रे, जयश्रीताई शेळके, शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह विविध मान्यवरांनी राजवाडा परिसरात अभिवादन केले.  जिजाऊसृष्टीवर दिवसभर उत्सव राजवाडा परिसरात अभिवादनासाठी एकीकडे जिजाऊभक्त दाखल होत असताना दुसरीकडे जिजाऊसृष्टीवर दिवसभर हजारोंची उपस्थिती होती. या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघासह इतर संघटनांच्या पुढाकाराने सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी मुख्य सोहळ्याला सुरवात झाली. मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा पार पडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT