बायोकॅप्सूल
बायोकॅप्सूल  
मुख्य बातम्या

कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा पुरवठा

टीम अॅग्रोवन

पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य कृषिउद्योग महामंडळाने आता ‘बायोकॅप्सूल’ नावाने जैविक खताचा पुरवठा सुरू केला आहे. “एका कॅप्सूलमध्ये सुमारे एक लाख कोटी जिवाणू आहेत. त्यामुळे द्विदल किंवा एकदल वर्गीय पिकांसाठी नत्राचा पुरवठा वाढणार आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) पेटंट असलेल्या या रायझो कॅप्सूल, अझोकॅप्सूलची किंमत ३५० रुपये ठेवण्यात आली आहे. बायोकॅप्सूलचा वापर राज्याच्या सेंद्रिय व जैविक शेतीच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा आहे,’’ अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापक दीपक पाटील यांनी दिली.  सेंद्रिय पदार्थांच्या जलद विघटनासाठी सूक्ष्म मूलद्रव्ये उपयुक्त ठरतात. ती पिकाला उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढविणे महत्त्वाचे असते. महामंडळाने एकूण आठ प्रकारच्या बायोकॅप्सूल शेतकऱ्यांना पुरवठा सुरू केला आहे. त्यात स्फुरदाचा सर्व पिकांसाठी पुरवठा होण्याकरिता पीएसबी प्लस कॅप्सूल तर नत्र, स्फुरद, पालाशचा सर्व पिकांच्या वापराकरिता एनपीके कॅप्सूल आणले गेले आहे. महामंडळाचे महाव्यवस्थापक महेंद्र बोरसे यांच्या म्हणण्यानुसार “राज्य शासनाच्या अखत्यारित काम करणाऱ्या कृषी उद्योग महामंडळाने बायोकॅप्सूल तयार करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा आधार घेतला आहे. सेंद्रिय आणि रासायनिक अशा दोन्ही वर्गातील शेतीसाठी बायोकॅप्सूल उपयुक्त ठरतील. महत्त्वाचा भाग म्हणजे जिवाणूच्या सध्याच्या वापरासाठी होणारा खर्च कमी होणार आहे. बायोकॅप्सूलच्या माध्यमातून साडेतीनशे रुपयात एक लाख कोटी जिवाणू हमखास उपलब्ध होऊ शकतील.’’  ...असा होतो वापर एक बायोकॅप्सूल पाच लिटर पाण्यात भिजवून ठेवल्यास पेरणीपूर्वी त्यातील एक लिटर पाण्यात बियाणे भिजवून ठेवता येते. उर्वरित चार लिटर पाणी फवारणीसाठी किंवा इतर पिकांच्या मुळाशी वापरता येते. फवारणीसाठी स्फ्रिंकलर अथवा ठिबकद्वारे देखील जिवाणू सोडता येतात. “महामंडळाने या तंत्रज्ञानासाठी छत्तिसगडच्या एसआरटी सायन्स या संस्थेची मदत घेतली आहे. पुणे भागातील काही शेतकऱ्यांना या कॅप्सूलच्या वापराबाबत चांगले निष्कर्ष हाती आले आहेत,’’ असे महामंडळाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT