पुणे : ग्रामीण कला आणि खाद्यसंस्कृतीची रेलचेल असलेल्या भीमथडी जत्रेचा शुक्रवारी (ता. २२) विविध पारंपरिक वाद्यांच्या वादनाने माेठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
या वेळी आदिवासी नृत्य, हलगी, लेझीमवादनाने उद्घाटन साेहळा रंगत गेला. पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक, पाेलिस आयुक्त रश्मी शुक्ला, जत्रेच्या मुख्य आयाेजक सुनंदा पवार, सई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन साेहळा रंगला हाेता. या वेळी मान्यवरांना आदिवासी नृत्यात फेर धरण्याचा माेह आवरला नाही.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेली ११ वर्षे बारामती येथील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने भीमथडी जत्रेचे आयाेजन करण्यात येत असून, यंदा जत्रेचे १२ वे वर्ष अाहे. यंदाच्या जत्रेत ३०० पेक्षा अधिक स्टॉल उभारण्यात आले असून, राज्याच्या विविध भागांतील अस्सल ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे.
यंदा ‘विषमुक्त अन्न’ या संकल्पनेवर विशेष दालन उभारण्यात आले असून, पारंपरिक पद्धतीने काेणतीही रसायने न वापरता शेती करणारे सुमारे १०० शेतकरी आपल्या विविध उत्पादनांसह यात सहभागी झाले आहेत. तसेच जत्रेमध्ये बारा बलुतेदारांनीदेखील आपल्या पांरपारिक व्यवसायाचे सादरीकरण केले आहे. साेमवारपर्यंत (ता. २५) जत्रा सुरू असणार असल्याचे आयाेजकांच्या वतीने सांगण्यात आले.