भीमा-सीना जोडकालव्यातून बेंद ओढ्यास सोडणार पाणी
भीमा-सीना जोडकालव्यातून बेंद ओढ्यास सोडणार पाणी 
मुख्य बातम्या

भीमा-सीना जोडकालव्यातून बेंद ओढ्यास सोडणार पाणी

टीम अॅग्रोवन

कुर्डू, जि. सोलापूर  ः माढा तालुक्यातील बेंद ओढ्यास भीमा-सीना जोड कालव्यातून केम मधील शाप्ट क्रमांक तीन येथून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय सोमवार (ता.३) मुंबईत मंत्रालय येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  मंत्री पाटील यांच्या दालनात ही बैठक पार पडली. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, माढा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, संजय पाटील-घाटणेकर, जिल्हा परिषद सदस्य शंभुराजे मोरे, संदीप पाटील, भारत कापरे, नामदेव हांडे, चौभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, पिंपळखुटेचे पवन पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत बेंद ओढ्यासह इतर योजनांच्या विषयावर चर्चा झाली. बेंद ओढ्याला शॅाप्ट नंबर-३ मधून पाणी उचलून अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल. तसेच पिंपळखुंटे, अंबड,  कुर्डू, बावी, तुळशी या गावांचा सीना-माढा योजनेत समावेश करण्याचा निर्णयही या वेळी झाला. भीमा-सीना जोड कालव्यामध्ये (बोगद्यामध्ये) महादेववाडी येथे गेट बसवण्यात येणार आहे, तसेच कुकडी व दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या सिंचन योजनेच्या कामासाठी सकारात्मक चर्चा झाली, या सिंचन योजना पाहणीसाठी जलसंपदामंत्री पाटील स्वतः येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. पण सध्या तरी भीमा-सीना जोड कालव्यातून बेंद ओढ्यास पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT