भंडारदरा
भंडारदरा  
मुख्य बातम्या

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले; मुळा धरणातही आवक

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी वरदान असलेले भंडारदरा धरणा शनिवारी (ता. ३) साडेदहा टीएमसी (१० हजार ५०० दशलक्ष घनफूट) पाणीसाठा झाल्याने हे धरण दुपारी दोन वाजता भरल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले.  दरम्यान, पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून ४४२५ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे धरण सहा दिवस आधीच भरले आहे. भंडारदरातून सोडलेले पाणी आता निळवंडे धरणात येणार असल्याने निळवंडेही लवकर भरणार असल्याचे सांगितले जात आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरु आहे.  अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा आणि भंडारदरा धरणात जोरात पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरण हे जिल्ह्याच्या उत्तर भागासाठी वरदान ठरलेले आहे. दरवर्षी हे धरण १५ ऑगस्टच्या आत भरते. ११ टीएमसी धरणाची साठवणक्षमता आहे. धरणात साडेदहा टीएमसी (१० हजार ५०० दशलक्ष घनफूट) पाणीसाठा झाला की धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करून धरणातून पाणी सोडले जाते. मुळा धरणातही आज (शनिवारी) ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुळा नदीतून कोतुळ येथे सकाळी सहा वाजता १८ हजार २३० क्युसेकने पाणी आवक सुरू होती. दुपारी ही आवक २९ हजार ५३३ झाली. त्यामुळे धरणात मुळातही झपाट्याने पाणी जमा होत आहे. घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी भागात जोरदार पाऊस सुरू  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT