संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

भंडारा जिल्हा परिषदेचा गड काँग्रेस-राष्ट्रवादीने राखला

टीम अॅग्रोवन

भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेकानंद कुर्झेंकर यांची निवड झाली. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे जिल्हा परिषदेचा गड कोण राखणार याविषयी चर्चांना ऊत आला होता. या निवडीमुळे चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. अडीच वर्षानंतर अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने त्याकरीता निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदाकरीता रमेश डोंगरे, रेखा वासनिक आणि नेपाल रंगारी यांनी अर्ज भरले.

उपाध्यक्षपदाकरीता विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, नीलिमा इलमे आणि विवेकानंद कुर्झेकर यांचे नामनिर्देशन दाखल झाले. रेखा वासनिक, विनायक बुरडे, प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली.

त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे रमेश डोंगरे यांना ३९ तर भाजपचे नेपाल रंगारी यांनी १२ मते मिळाली. एक सदस्य तटस्थ राहिला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर यांना ३९ तर भाजपच्या नीलिमा इलमे यांना १२ मते मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT