केळी
केळी  
मुख्य बातम्या

केळीचे दर ५५० रुपयांवर

टीम अॅग्रोवन

नागपूर ः निर्यातीचा मुद्दा मागे पडल्यानंतर विदर्भात पुन्हा केळीचे दर पडल्याने उत्पादकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. दरातील घसरणीमुळे क्‍विंटलमागे सुमारे ३०० ते ४०० रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती केळी उत्पादकांनी दिली.   जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे उघडणारे भाव केळी खरेदी विक्रीसाठी प्रमाण मानले जातात. विदर्भात अंजनगावसूर्जी (जि. अमरावती) येथील बोर्ड केळी दराबाबत विचारात घेतला जातो. विदर्भात सर्वाधिक साडेचार हजार हेक्‍टर केळी लागवड क्षेत्र अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात आहे. चिखलदरा, अंजनगावसूर्जी (जि. अमरावती) अकोट (जि. अकोला) या भागात अधिक केळी होते. वाशीम जिल्ह्यात हे क्षेत्र २५ ते ३० हेक्‍टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  जळगाव जिल्ह्यात पीक सातत्याने घेतले जात असल्याने पोटॅशचे प्रमाण कमी होत गेल्याने केळीच्या चवीतदेखील परिणाम झाल्याचे जाणकारांनी सांगितले. शिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने केळीच्या सालीवर डाग पडतात. त्यामुळे निर्यातदारांकडून या भागातील केळीला मागणी घटू लागली आणि पर्यायाने ती विदर्भात वाढली. काही महिन्यांपूर्वीच अकोट तालुक्‍यातून ५१० टन (३० कंटेनर) केळी आखाती देशात निर्यात करण्यात आली. सुमारे १००० रुपये क्‍विंटलचा दर या माध्यमातून निर्यातदार केळी उत्पादकांना मिळाला.  दर घटले निर्यातीमुळे केळी उत्पादकांना १००० रुपये क्‍विंटलपर्यंतचा दर मिळाल्याने व्यापाऱ्यांनी ७०० रुपये क्‍विंटलने केळीची खरेदी त्या काळात केली. आता निर्यात थंडावल्याचे लक्षात येताच हे दर ५५० रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. प्रतिक्रिया विदर्भातील केळीवर सध्या शिगाटोकाचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे केळी डागाळलेली नसल्याने निर्यातदारांकडून वाढती मागणी आहे. ही संधी मानून शेतकऱ्यांनी निर्यातदारांच्या संपर्कात राहून जादा दर पाडून घेणे गरजेचे आहे. - सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT