banana cultivation is slow in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात कांदेबाग केळीची लागवड रखडत

जळगाव : प्रतिकूल वातावरण व दर्जेदार वाणांची टंचाई, यामुळे खानदेशातील कांदेबाग केळीची लागवड अजूनही रखडत सुरू आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव  : प्रतिकूल वातावरण व दर्जेदार वाणांची टंचाई, यामुळे खानदेशातील कांदेबाग केळीची लागवड अजूनही रखडत सुरू आहे. ही लागवड यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहील, असे संकेत आहेत. लागवडीची अंतिम माहितीदेखील जाहीर करण्यासंबंधी कृषी विभाग कार्यवाही करीत नसल्याची स्थिती आहे. 

मुबलक जलसाठे असल्याने कांदेबाग केळी लागवड वाढेल, असे सांगितले जात आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टरवर ही लागवड अपेक्षित आहे. जळगाव तालुक्यात सुमारे १३०० हेक्टरवर, जामनेरात सुमारे ४०० ते ५०० हेक्टरवर आणि पाचोरा-भडगाव भागात सुमारे ४०० ते ५०० हेक्टरवर कांदेबाग केळीची लागवड अपेक्षित आहे. आता थंडी वाढत आहे. यामुळे जी लागवड गेल्या आठवड्यात झाली, त्यातील कंदांचे बीजांकुरणही व्यवस्थित होत नसल्याची स्थिती आहे. 

बीजांकुरण चांगले होण्यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन कमी केले आहे. यात अनेक भागात कंद वाया जाऊन नांग्या भरण्याची वेळ येईल, असेही सांगितले जात आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यात कांदेबाग केळीची लागवड पूर्ण होत आली आहे. कांदेबाग केळीची लागवड खानदेशात तापी, अनेर नदीकाठी अधिक होत असते. काळ्या कसदार जमिनीत कंदांची लागवड सप्टेंबरच्या मध्यात सुरू होते. ही लागवड ऑक्टोबरच्या मध्यात पूर्ण केली जाते. पण यंदा सुरवातीपासून स्थिती अनुकूल नसल्याने लागवडीवर परिणाम दिसत आहे.

लागवड फारशी न वाढण्याची शक्यता

सध्या दर बऱ्यापैकी आहेत. यामुळे लागवड वाढेल, असे संकेत होते. परंतु थंडीचे आगमन झाल्याने लागवड पुढे थांबू शकते, असे सांगितले जात आहे. यामुळे पुढे कांदेबाग केळीची लागवड फारशी वाढणार नाही, असे दिसत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT