Banana crop insurance criteria changed for minister's benefit: Girish Mahajan
Banana crop insurance criteria changed for minister's benefit: Girish Mahajan 
मुख्य बातम्या

केळी पीकविम्याचे निकष मंत्र्यांच्या फायद्यासाठी बदलले ः गिरीश महाजन

टीम अॅग्रोवन

जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत गेल्या वर्षी जे निकष होते, ते हेतुपुरस्सरपणे बदलण्यात आले व ही योजना कंपन्यांचे भले करणारी तयार केली. ही योजना मंत्र्यांचे खिसे गरम करण्यासाठी आहे, की शेतकऱ्यांसाठी असा आरोप राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता. २) पत्रकारांशी वार्तालाप करताना केला.

फळ पीकविमा योजनेत केळी पिकासाठी जाचक परतावा निकष लागू केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाले तरी परतावे मिळू शकणार नाहीत. या संदर्भात भाजपने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून हे निकष बदलण्याची मागणी केली.

या वेळी माजी मंत्री महाजन यांच्यासह जळगावचे खासदार उन्मेष पाटील, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, डॉ. राधेश्‍याम चौधरी व इतर नेते उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यासंदर्भात सोमवारी (ता. ९) जिल्ह्यात मोठे आंदोलन केले जाईल, असेही महाजन म्हणाले.

महाजन म्हणाले की, केळी पिकासाठी जुने निकष बदलून केळी उत्पादकांवर अन्याय केला. ही योजना कुणासाठी आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. मंत्र्यांचे खिसे गरम करण्यासाठी ही योजना असून, राज्य शासनाने केळी उत्पादकांवर अन्याय केला आहे. राज्य शासनाला जे अधिकार दिले होते, त्याचा योग्य उपयोग केला नाही. आता शासन केंद्र सरकारवर आरोप करून हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारची काहीही चूक नाही. जी चूक केली, गडबड केली ती राज्यातील मंडळीने केली आहे. हा प्रश्‍न अतिशय गंभीर असून,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT