grapes
grapes  
मुख्य बातम्या

द्राक्ष निर्यातदार, पॅकहाउसवरील निलंबन कारवाई रद्द

टीम अॅग्रोवन

नाशिक: नाशिकमधून गेलेल्या ४१ कंटेनरमध्ये कीड सापडल्याचा संशय व्यक्त करीत रशियाच्या प्लांट क्वारंटाइन विभागाने परत पाठविले होते. त्यामुळे भारत सरकारच्या वनस्पती संरक्षण, संगरोध व संग्रह महासंचालनालयाने १४ निर्यातदार व संबंधित पॅकहाउसचे परवाने निलंबित करण्यात आले. अखेर बुधवारी (ता. २८) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी निर्यातदारांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या वेळी तिढा सुटला असून, द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाउसचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  रशियामध्ये २०१९-२० च्या द्राक्ष हंगामात १५०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली होती. त्यापैकी ४१ कंटेनरमध्ये कीड सापडली, असे वनस्पती संगरोध विभागाने कळविण्यात आल्यानंतर निर्यातदारांचे आणि पॅकहाउस परवाने निलंबित करण्यात आले. त्यामुळे संबंधित निर्यातदारांवर निर्यात हंगामाच्या तोंडावर टांगती तलवार होती. मात्र प्रत्यक्षात ही कीड आढळत नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने कळविले होते. तसेच या विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर चौकशीत प्रश्‍नावलीला निर्यातदारांनी उत्तर दिले होते.  ही कोंडी फोडण्यासाठी डॉ. भारती पवार यांच्यासमवेत द्राक्ष निर्यातदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्रालय गाठले. त्यामध्ये अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, द्राक्ष निर्यातदार मधुकर क्षीरसागर, निर्यातदार परेश भयानी यांचा समावेश होता. या वेळी चर्चेनंतर हे निलंबन मागे घेण्यात आल्याचे पत्र निर्यातदारांना दिले आहे. यासंबंधीचे आदेश केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. पी.एस. नैन यांनी दिले आहेत. याबाबत वनस्पती संगरोध विभागीय कार्यालयाचे प्रभारी,‘अपेडा’चे अध्यक्ष यांना कळविण्यात आले आहे. पॅकहाउसचा उपयोग हंगामानंतर द्राक्षांखेरीज इतर फलोत्पादन क्षेत्रासाठी करण्याचा प्रश्‍न केंद्रीय मंत्रालयाच्या या निर्णयानंतर मार्गी लागला आहे.

निर्यात करताना दक्षता घ्या ! रशियासाठी ‘टेबल ग्रेप्स’ निर्यात करताना भविष्यात अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना निर्यातदार आणि पॅकहाउस चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच कंटेनर आयात होणाऱ्या देशापर्यंत समाधानकारक परिस्थितीत पोचतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. फायटो सॅनिटरी प्रक्रियेकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : साठ वर्षे सत्ता उपभोगली, पण शेतीपर्यंत पाणी पोहोचवले नाही

Electoral Bond : निवडणूक रोखे छपाईप्रश्नी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला नोटीस

Onion Market : केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल

Rain Forecast : द. आशियात सरासरीपेक्षा अधिक पाऊसमान

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

SCROLL FOR NEXT