लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्राला पुरस्कार 
मुख्य बातम्या

लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्राला पुरस्कार

टीम अॅग्रोवन

अकोला : भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे) योजनेची सहावी वार्षिक समूह सभा आसामच्या जोरहाट येथील कृषी विद्यापीठात झाली. यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) योजनेस उत्कृष्ट कार्यासाठी द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

या वार्षिक सभेमध्ये सन २०१८-१९ कालावधीतील संशोधनाचा आढावा व पुढील वर्षातील संशोधनाची वाटचाल या विषयक चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये देशातील विविध राज्याअंतर्गत ३० कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरुस्कृत १४ संस्था, केंद्रीय कृषी विद्यापीठांतील ६ केंद्रे, असे एकूण २०० शास्त्रज्ञ, विविध फळ पिकांचे राष्ट्रीय संशोधन केंद्रांचे एकूण सात संचालकांनी सहभाग घेतला.

बंगळुरूस्थित भारतीय बागवाणी अनुसंधान संस्थेने निर्मित केलेल्या परिमाण व निकषानुसार या सभेमध्ये प्रत्येक केंद्राने मागील वार्षिक काळात नेमून दिलेले कार्य विहित मुदतीमध्ये कशाप्रकारे साध्य केले यानुसार गुणांक दिले जातात. त्यानुसार ९२.५१ टक्के गुण पंदेकृवितील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (लिंबूवर्गीय फळे) योजनेने पटकावित देशातून उत्कृष्ट संशोधन केंद्राचा द्वितीय पुरुस्कार मिळवला. 

हा पुरस्कार परिषदेचे अतिरिक्त संचालक (उद्यान विद्या) डॉ. ढिल्लोन, बागवाणी अनुसंधान संस्थचे संचालक डॉ. दिनेश कुमार व प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे यांनी हा तो स्वीकारला. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी मार्गदर्शन केले. योजनेचे समन्वयक डॉ. विलास खर्चे यांचे सहकार्य लाभले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT