Ashawgandha  
मुख्य बातम्या

अश्‍वगंधा निर्यातीत तिपटीने वाढ 

करोना काळ आयुष क्षेत्रासाठी लाभदायी ठरला आहे. आयुष क्षेत्राची जवळपास ४४ टक्के वाढ झाली आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : करोना काळ आयुष क्षेत्रासाठी लाभदायी ठरला आहे. आयुष क्षेत्राची जवळपास ४४ टक्के वाढ झाली आहे. आयुष औषधे, औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, अश्‍वगंधाची निर्यात तिपटीने वाढल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी दिली. 

विविध संस्थांच्या समावेशातून आयुष महासंघ स्थापन करण्यासंदर्भातील सामंजस्य करारानिमित्त कोटेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुधवारी (ता. १०) आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना काळात केलेली संशोधने, आयुषचे महत्त्व अशा विविध विषयांवर त्यांनी माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन या वेळी उपस्थित होते. 

श्री. कोटेचा म्हणाले, की करोना काळात विविध संस्थांच्या माध्यमातून आयुष संबंधित विविध संशोधने, सर्वेक्षणे करण्यात आली. आयुषच्या संशोधनांमध्ये पुणे हे महत्त्वाचे केंद्र होते. संशोधनासाठी जवळपास १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिवीरसारख्या औषधांचे गुणधर्म आयुर्वेदिक औषधांमध्ये असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. आयुष औषधांच्या संशोधनालाही चालना मिळाली. त्यापैकी काही औषधांच्या चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे. 

करोना काळात एकूण आयुष क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आयुष क्षेत्राची जवळपास ४४ टक्के वाढ झाली. अश्‍वगंधाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, तसेच अश्वगंधाची निर्यातही तिप्पट झाली. आयुर्वेदिक काढा, चूर्ण, च्यवनप्राशसाख्या उत्पादनांना मागणी वाढली. त्यामुळे आयुष कंपन्यांच्या उत्पादनांनाही कित्येक पटींनी मागणी वाढल्याचे कोटेचा यांनी स्पष्ट केले.  संशोधनाला चालना  पुढील काळात आयुष संबंधित शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन करण्यासाठी चालना दिली जाणार आहे. विज्ञान आणि नवसंकल्पनांचा आयुष हा मोठा भाग आहे. आर्थिक अंदाजपत्रकात आयुष मंत्रालयासाठी आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात आली आहे, असेही कोटेचा यांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT