वाशीम जिल्ह्यात सफरचंद, स्ट्रॉबेरीचा प्रयोग  
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यात सफरचंद, स्ट्रॉबेरीचा प्रयोग 

वाशीम : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी यंदा अर्ध्या एकरात स्‍ट्रॉबेरीची लागवड केली आहे. तसेच त्यांनी दोन ते सव्वादोन एकरांत सफरचंदही लावलेले आहेत. त्यात आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी पिकवली.

Gopal Hage

वाशीम : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी यंदा अर्ध्या एकरात स्‍ट्रॉबेरीची लागवड केली आहे. तसेच त्यांनी दोन ते सव्वादोन एकरांत सफरचंदही लावलेले आहेत. त्यात आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी पिकवली. चांगल्या दर्जाचे उत्पादन आले असून, सध्या स्ट्रॉबेरीची विक्री करीत आहेत. फेब्रुवारीपर्यंत हा हंगाम चालू शकतो, असे ते म्हणाले. अर्ध्या एकरात ४० ते ५० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा त्यांना आहे.  स्ट्रॉबेरीचे हे पीक थंड हवेच्या वातावरणात येते असा सर्वांचा समज आहे. परंतु वाशीम जिल्ह्यातील चांदई येथील सचिन मधुकर ठाकरे यांनी विषम स्वरूपाचे वातावरण असतानाही अर्ध्या एकरात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यात यश मिळवले आहे. ठाकरे यांच्यामुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसमोर नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.  स्ट्रॉबेरी लागवडीसाठी त्यांनी १२ रुपये प्रतिरोप खरेदी केले होते. ही रोपे मल्चिंग पेपरवर लावले. त्यांनी दोन ते सव्वादोन एकरांत सफरचंदाची लागवड केली आहे. या झाडांच्या मधात १५ फुटांचे अंतर आहे. त्या रिक्त जागेत त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. पहिल्याच हंगामात त्यांना या पिकातून विश्‍वास निर्माण आहे. त्यांची ही स्‍ट्रॉबेरी ५० व्या दिवशी काढणीला तयार झाली. थंड प्रदेशात किमान ६० दिवस लागतात. त्यांना १० दिवस आधीच माल काढणीसाठी मिळाला. त्यांना ५०० ते ७०० ग्रॅम प्रति झाड उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत पाच ते सहा क्विंटल स्‍ट्रॉबेरी विक्री झाली.  मंगरूळपीरसह वाशीम व कारंजा मार्केटमध्ये विक्री केली जात आहे. वाशीम येथे कृषी विभागाकडून भरविल्या जात असलेल्या भाजीपाला विक्री केंद्रातही विक्रीसाठी ठेवली जाते. पहिल्याच वर्षात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सफरचंदाच्या बागेत यंदा पहिला बहर धरणार आहे. या वर्षी फेब्रुवारीत फुलधारणा होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात फळधारणा सुरू होईल. साधारणपणे जूनपर्यंत फळे परिपक्व होतील, असा अंदाज सचिन यांनी व्यक्त केला.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT