बाजार समिती कर्मचारी संघ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात 
मुख्य बातम्या

बाजार समिती कर्मचारी संघ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

टीम अॅग्रोवन

नाशिक: महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांमध्ये काम करणारे सचिव ते शिपाई अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून अध्यादेश काढा, नाहीतर पुन्हा मुंबई येथे न्यायहक्कांसाठी आंदोलन पुकारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ यांनी मुख्यमंत्री व पणनमंत्री यांना निवेदनातून दिला आहे.  आपल्या मागण्यांसाठी बाजार समिती कर्मचारी संघाने अनेकदा पाठपुरावा केला. मात्र शासनाने दखल न घेतल्यामुळे १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान उपोषण केले. या वेळी सहकारमंत्री सुभाष देहसमुख यांनी २५ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. येत्या २८ तारखेपर्यंत जर बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा अध्यादेश काढला नाही, शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले नाही किंवा पगारासाठी अनुदान दिले नाही तर सरकारने न्याय दिला नाही असे होईल. तर कर्मचारी पुन्हा दुसरे आंदोलन पुकारतील असा इशारा देण्यात आला आहे.  यावर महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष नीलेश दिंडे, बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी विलास फुंडकर, कुशी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजीराव मगर (कृउ बास, पुसद - यवतमाळ), पुरुषोत्तम खडांगळे (पैठण - औरंगाबाद), प्रशांत शिंगणे (देऊळगाव राजा - बुलडाणा), धनराज शिपणे (चिखली - बुलडाणा), सतीश निकम (गंगापूर - औरंगाबाद) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT