Amravati Market Committee to set up 'Agriculture Hub' 
मुख्य बातम्या

अमरावती बाजार समिती उभारणार ‘ॲग्रिकल्चर हब’

शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या निविष्ठा, सेवा आणि सुविधा एकाच छताखाली असाव्यात या संकल्पनेतून अमरावती बाजार समितीने ‘ॲग्रिकल्चर हब’ ही संकल्पना मांडली आहे.

टीम अॅग्रोवन

अमरावती : शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या निविष्ठा, सेवा आणि सुविधा एकाच छताखाली असाव्यात या संकल्पनेतून अमरावती बाजार समितीने ‘ॲग्रिकल्चर हब’ ही संकल्पना मांडली आहे. तब्बल १२० एकरांवर हा प्रकल्प साकारला जाणार असून, त्याकरिता जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात येणार आहे.

अमरावती बाजार समितीच्या वतीने सध्या शेतीमालाची खरेदी होते. या भागात संत्रा लागवड क्षेत्र सर्वाधिक असताना बाजार समितीकडून मात्र संत्रा खरेदी होत नाही. सोयाबीन, भुईमूग, तूर अशा शेतीमालाच्या खरेदीवरच बाजार समितीचा भर आहे. आता मात्र बाजार समितीने ‘ॲग्रिकल्चर हब’ या संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली आहे. सभापती अशोक दहीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या देखील पसंतीस ती उतरली. त्यानंतरच्या काळात या संकल्पनेला मूर्तरूप देण्याकरिता जागेचा शोध सुरू झाला. 

कोंडेश्‍वर मार्गावर शासकीय जागा आहे तर काही खासगी जागा बाजार समिती प्रशासन खरेदी करणार आहे. अशा प्रकारे सुमारे १२० एकरांवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बी-बियाणे यासारख्या हंगामात लागणाऱ्या निविष्ठा, शेतीकामात वापरले जाणारे सयंत्र जसे ट्रॅक्टर व इतर अवजारांचे स्पेअर पार्ट, शेतीमालाची खरेदी- विक्री, रेशीम खरेदी तसेच आठवड्यातून एकदा गुरांचा बाजार असे सबकुछ एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. बाजार समिती व स्थानिक प्रशासनाकडून या संकल्पनेसाठी लागणाऱ्या जागेचे मोजमाप यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यानंतर या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. मात्र त्यात काही त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करून नव्याने सादर करण्याचे बाजार समिती प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. 

या सुविधा मिळणार  

  • कृषी संयंत्राचे स्पेअर पार्ट व दुरुस्ती.
  • शेतीमाल खरेदी.
  • रेशीम बाजार
  • फळ-भाजीपाला मार्केट
  • सेंद्रिय धान्य विभाग.
  • गुरांचा बाजार.
  • बी-बियाणे, खते व निविष्ठा.
  • दैनंदिन गरजेच्या वस्तू.
  • बँकिंग सुविधा.
  • शेती मार्गदर्शन कक्ष. 
  • निवास सुविधा
  • शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या सेवासुविधा एकाच छताखाली असाव्यात या हेतूने ॲग्रिकल्चर हब ही संकल्पना मांडली आहे. या ठिकाणी शेतीमालाची नियमित खरेदी होईल त्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. कोंडेश्वर मार्गावर काही शासकीय व खासगी जागा उपलब्ध आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे. तो त्रुटीत असला तरी त्याची पूर्तता करून शासनाकडे पाठविला जाईल. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बाजार समितीकडून पुढाकार घेतला जाणार आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा एकमेव आणि दिशादर्शक प्रकल्प असणार आहे.  - अशोक दहीकर, सभापती, बाजार समिती, अमरावती

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

    Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

    Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

    Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

    Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

    SCROLL FOR NEXT