शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती 
मुख्य बातम्या

शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती

टीम अॅग्रोवन

अकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या शासकीय दूध डेअरीमधील वायू टॅंकचा वॉल लिकेज झाल्याने अमोनियाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी घडली. ही वायू गळती रात्री उशिरा थांबवण्यात यश आले. शीतकरण विभागातील यंत्रणा २५ वर्षे जुनी असल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले. 

येथील शासकीय दूध डेअरीमध्ये असलेल्या शीतकरण केंद्रातील अमोनिया गॅसच्या टॅंकचा वॉल दुपारच्या सुमारास लिकेज झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात अमोनिया गॅस वातावरणात पसरायला सुरवात झाली. ही घटना तेथील अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत दुग्ध शाळा व्यवस्थापकांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. 

या घटनेत सुमारे ३०० किलो अमोनिया गॅसची गळती झाली. टँकमध्ये ८०० किलो गॅस होता. उर्वरित गॅस दुसऱ्या टॅंकमध्ये भरण्यात आला. अग्निशमन विभागाच्या चार गाड्यांसह १५ कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत ही गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. शासकीय दूध डेअरीत असलेली मशिनरी जुनी झाली असून त्यात तताडीने बदल करण्याची बाब या प्रकरणामुळे समोर आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT