दूध उत्पादक, विक्रेत्यांना मुभा Allow milk producers and sellers 
मुख्य बातम्या

बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना मुभा 

जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी सुधारित पत्रक काढून दूध उत्पादक शेतकरी आणि वितरकांसाठी लॉकडाउनमध्ये वेळ वाढवून दिली आहे.

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, याचा फटका दूध उत्पादक व विक्रेत्यांना बसण्याची चिन्हे निर्माण झाल्याने वेळा वाढवून देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन रविकांत तुपकर यांनी अडचणींची जाणीव करून दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सुधारित पत्रक काढून ही मागणी मान्य केली आहे. 

प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत. या निर्बंधात दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक आणि संकलन केंद्रांची मोठी अडचण होण्याची शक्यता होती. जनावरांच्या धारा काढण्याची वेळ, दूध संकलन आणि विक्रीची वेळ आणि संचारबंदीच्या आदेशात मेळ लागत नव्हता. नुकसान होण्याची शक्यता असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांनी दूध उत्पादक व विक्रेत्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी राममूर्ती यांच्याशी भेटून चर्चा केली होती.

आयुक्त पियुष सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. संघटनेच्या या मागणी दखल घेत आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूध उत्पादक व विक्रेत्यांना सूट देण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लॉकडाऊनचे सुधारित आदेश देत दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली आहे.

आता सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंतची वेळ उपलब्ध असणार आहे. सकाळपासून दुपारपर्यंत नऊ तास आणि सायंकाळी अडीच तासांची मुभा मिळाली आहे. यामुळे दूध उत्पादक, विक्रेते व संकलन केंद्र संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Import Policy: आयात धोरण शेतकरी, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे- कृषिमंत्री चौहान

Rabi Crop Competition: रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करा

Micro Irrigation: पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर

Farmer Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत

Organic Sugarcane Farming: सेंद्रिय पद्धतीने वाढवली ऊस उत्पादकता 

SCROLL FOR NEXT