tur
tur  
मुख्य बातम्या

हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण क्षेत्र ग्राह्य धरणार

टीम अॅग्रोवन

वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत अत्यंत कमी आहे. आंतरपीक म्हणून मोठ्या क्षेत्रावर लागवड केली जाते. नेमकी हीच अडचण यंदा शेतकऱ्यांना तूर विकताना मारक बनली होती. हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विकताना द्यावा लागणाऱ्या सातबारा उताऱ्यात आंतरपीक म्हणून लागवड झालेल्या तुरीचे क्षेत्र येत नव्हते. आता शासनाने याची दखल घेत सोयाबीन पिकासह आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीचे लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरावे, अशी सूचना केली आहे. तसेच तुरीची उत्पादकता निश्‍चित करण्याच्या सूचनादेखील संबंधितांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात यंदा आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हेक्टरी चार क्विंटल ७८ किलो तूर खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. यामुळे तूर उत्पादक चिंतित झाले होते. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य झाले नव्हते. जिल्ह्यात खरिप हंगामात सोयाबीन व तूर ही मुख्य पिके आहेत. त्यामुळे सोयाबीन या पिकात शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात. शेतकऱ्यांना तूर या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असते. यंदा परतीच्या पावसाने तुरीचे पीक चांगले बहरले होते. त्यामुळे शेतकऱ्‍यांना तुरीच्या पिकाने देखील चांगलाच हातभार दिला. मात्र, खुल्या बाजारात तुरीला अवघा चार हजार रुपये दर मिळत होता. तर आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या तुरीला पाच हजार ८०० रुपये दर दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे मोठे नुकसान सहन करावे लागत होते. खरेदी मर्यादेमुळे नाराजी आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात हेक्टरी चार क्विंटल ७८ किलो एवढीच तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. त्यातच बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणेदेखील शक्य झाले नाही. ही बाब पाहता आता ऑनलाइन नोंदणीकरिता १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सोयाबीन पिकांसोबत आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीच्या लागवडीखालील पूर्ण क्षेत्र ग्राह्य धरून, उत्पादकता निश्‍चित करण्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT