गुजरातला पाणी देण्यासाठी राज्याचे केंद्रासमोर लोटांगण
गुजरातला पाणी देण्यासाठी राज्याचे केंद्रासमोर लोटांगण 
मुख्य बातम्या

गुजरातला पाणी देण्यासाठी राज्याचे केंद्रासमोर लोटांगण

टीम अॅग्रोवन

नाशिक  : नार-पार, दमणगंगा-पिंजाळ या पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला देण्यासाठी केंद्र सरकारपुढे राज्याने लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व पक्षाच्या जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली. 

सरकारने हे पाणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात वळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करावा. तसेच योग्य ती कारवाई न केल्यास येत्या काळात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात सभा घेईल, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे व आमदार जयंत जाधव उपस्थित होते. 

पश्‍चिमवाहिनी नद्यांचे एक थेंब पाणी गुजरातला देणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात मात्र नार-पार-गिरणा जोड प्रकल्पाच्या अहवालासाठी साडेतेरा कोटींचा निधी मंजूर करत राज्याच्या हक्‍काचे पाणी गुजरातला देण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. या प्रकल्पासोबतच दमणगंगा-गोदावरी लिंकचा सविस्तर अहवाल सरकार का तयार करत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

तापी खोरे महामंडळाने राष्ट्रीय जलविज्ञान विकास प्राधिकरणाच्या अहवालाला मंजुरी देत नार-पारच्या खोऱ्यात १९.३८ टक्के पाणी उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात वळविणे शक्य असल्याचे म्हणाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत राज्य सरकारने केवळ १०.५० टक्के टीएमसी पाणी वळविण्यासाठी नार-पार-गिरणा अहवाल तयार करण्यास मान्यता देत निधी मंजूर केला आहे. त्यामुळे उर्वरित पाणी नार-पार-तापी खोऱ्यातून गुजरातला पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. 

नार-पार, दमणगंगा-एकदरे खोऱ्यात एकूण १३३ टीएमसी पाणी आहे. नार-पार-गिरणा व दमणगंगा-पिंजाळ-गोदावरी प्रकल्पाद्वारे तापी, गिरणा व गोदावरी खोऱ्यात वळविणे शक्य आहे. त्यामुळे येवला, नांदगाव व चांदवडला तसेच जळगाव, धुळे, मराठवाड्याला फायदा होईल, असा विश्‍वास पगार यांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT