संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान

मनोज खुटाटे 

जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या विदर्भातील संत्रा पीक व उत्पादक मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे जेरीस आले आहेत. जानेवारी महिन्यात झालेली गारपीट व एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेला तापमान बदल यामुळे संत्रा पिकाचे ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान झाले आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्‍वर, सावनेर व हिंगणा तालुक्‍यात सुमारे ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रात संत्रा पीक घेण्यात येते. मागील काही वर्षांत संत्रा पिकाला निसर्गाची व वातावरण बदलाची नजर लागल्याचे चित्र आहे. मागील वर्षी २०१७ साली मे महिन्यात झालेल्या पावसामुळे ताणाचे गणित बिघडले. ८० टक्‍क्‍यांपर्यंत मृग बहर गळाला. 

सप्टेंबर व ऑक्‍टोबर यंदा जानेवारी महिन्यात गारपीटीमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात सातत्याने होत असलेल्या तापमान बदलाचा फटका संत्रा उत्पादकांना सहन करावा लागत आहे. तापमान ४४ डिग्रीपर्यंत पोहचल्याने फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच भूजल पातळीत होणारी घट यामुळे सिंचनास अडथळा निर्माण होणार असल्याने संत्रा गळती वाढेल असे जार शेतकऱ्यांनी सांगितले. 

मृग बहराची फुट निसर्गाच्या अनियमितेमुळे कमी झाली. काही भागात गारपीट झाल्याने त्याचे नुकसान झाले. तसेच गारपीटीच्या वेळी यावर आंबिया बहार देखील होता याचे नुकसान झाले. पण आता गारपिटीचा प्रभाव राहिला नाही. आता फक्त वाढत्या तापमानामुळे काही प्रमाणत फळांची गळ होईल. शेतकऱ्यांनी नियोजन करून सिंचन केल्यास फळगळ कमी होईल.  - अजय आटे, तालुका कृषी अधिकारी, नरखेड 

संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये फळांची फूट कमी झाली आहे. त्यात मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीचा परिणाम आता दिसू लागला आहे. आंबिया बहारच्या संत्राला झाडांना गारपिटीची इजा झाल्यामुळे वाळतात व तयार झालेल्या फंगसमुळे गळती वाढली आहे. - वसंत चांडक , संत्रा उत्पादक, माजी सभापती, पं.स. नरखेड 

संत्र्याचा आंबिया बहर व मोसंबी बागांची फुट उशिरा झाली. सध्या फळे कोहळ्या अवस्थेत आहे. त्यात एकाएकी तापमानात वाढ झाल्यामुळे ५० ते ६० टक्‍के फळांची गळ झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान ५० टक्‍क्‍याहून अधिक असल्याने शासनाने नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी.  - प्रदीप गंगाराम कळंबे, संत्रा उत्पादक, जलालखेडा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT