केळी लागवड
केळी लागवड 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात तापमानवाढीमुळे केळी लागवड लांबली

Chandrakant Jadhav

जळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळी लागवड काही भागांत झाली असली तरी चोपडा, जळगाव भागांत कांदेबाग लागवडीला अद्याप सुरवात झालेली नाही. अर्थातच सध्या उष्ण व आर्द्रतायुक्त वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कांदेबाग लागवड टाळणे पसंत केले आहे.  दिवाळीपूर्वी लागवड करण्याचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चोपडा व जळगाव तालुक्‍यांत सर्वाधिक कांदेबागांची लागवड केली जाते. यावल, रावेर व मुक्ताईनगर तालुक्‍यांत फारशी कांदेबाग लागवड केली जात नाही. यावल, रावेरात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यांत केळीची लागवड केली जाते.  चोपडा, जळगाव भागांत जवळपास चार हजार हेक्‍टरवर कांदेबागांची लागवड केली जाते. त्यासाठी कंदांना पसंती दिली जाते. ही लागवड दरवर्षी सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होते. परंतु यंदा हवा तसा पाऊस सप्टेंबरमध्ये झाला नाही. यासोबतच उष्णता अधिक आहे. खेळती हवा नाही. त्यामुळे केळीची लागवड केली तरी तिच्या अंकुरणाला बाधा पोचू शकते, अशी स्थिती आहे.  कंद सडण्याची भीती उष्णतेसह प्रतिकूल वातावरणात कंदांचे अंकुरण व्यवस्थित होत नाही, यातच खोड सडण्याची शक्‍यताही असते. त्यामुळे नांग्याही अधिक भराव्या लागतात. नांग्या अधिक भराव्या लागल्या तर पुढे केळी एकाच वेळी निसवत नाही. बाग कापणीस उशीर होतो, असे केळी उत्पादक शेतकरी सत्त्वशील पाटील (कठोरा, जि. जळगाव) यांनी सांगितले.

सध्या केळीची लागवड शेतकरी टाळत असले, तरी वाफसा चांगला असल्याने शेतांची नांगरणी, शेत भुसभुशीत करणे आदी कामे शेतकरी उरकून घेत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर लागवडीसाठी सऱ्यादेखील पाडून घेतल्या आहेत.  पाचोरा, तोंडापूरच्या कंदांना पसंती पाचोरा, कजगाव (ता. भडगाव) येथील नवती केळी बागांची कापणी अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच तोंडापूर (ता. जामनेर) येथील नवती केळी बागांमध्येही कंद उपलब्ध होऊ लागले आहेत. तापीकाठावरील गावांमध्ये तोंडापूर, कजगाव येथील केळीचे कंद चांगले अंकुरतात व पुढे बहरतात, असे शेतकरी मानतात.

त्यामुळे पाचोरा, जामनेर भागांत कंद काढण्यासंबंधी जळगाव, चोपडा भागांतील शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेतली आहे. त्यासाठी आगाऊ बेणे कंद खोदणाऱ्या मजुरांना दिले जात असल्याची माहिती आहे. काही शेतकऱ्यांनी तर कंद आपल्या शेतात आणून ते केळीची कोरडी पाने, गोणपाटाने झाकून ठेवली आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT