गोविंद औसेकर यांच्याकडील पंढरपुरी म्हैस.
गोविंद औसेकर यांच्याकडील पंढरपुरी म्हैस. 
मुख्य बातम्या

पंढरपुरी म्हशींचे संवर्धन करणारे औसेकर यांचा गौरव

टीम अॅग्रोवन

पुणे  ः जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संवर्धन करणारे पंढरपूर (जि. सोलापूर) येथील पशुपालक गोविंद पाराजी औसेकर यांना राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात येणार आहे. मदुराई (तामिळनाडू) येथील ‘सेवा` या संस्थेतर्फे दर दोन वर्षांनी देशभरातील जातिवंत भारतीय पशू, पक्षांचे संवर्धन, पैदास आणि प्रसार करणाऱ्या व्यक्ति किंवा संस्थांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात येतो. कर्नाल( हरियाणा) येथे २१ मे रोजी होणाऱ्या समारंभामध्ये गोविंद औसेकर यांचा प्रशस्तीपत्र आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

याबाबत माहिती देताना ‘सेवा` संस्थेचे सदस्य डॉ. भास्कर बोरगांवकर म्हणाले की, गोविंद पाराजी औसेकर यांच्याकडे चार पिढ्यांपासून पंढरपुरी म्हशींचे संवर्धन केले जाते. औसेकर यांना त्यांच्या वडिलांच्या काळापासून पंढरपुरी म्हशीच्या संवर्धनासाठी राज्य तसेच देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. डॉ. विश्वास मोरे आणि डॉ. अनिल सरदेशमुख यांनी गोविंद औसेकर यांना जातिवंत पंढरपुरी म्हशीच्या संगोपनासाठी मार्गदर्शन केले आहे. 

आमच्याकडे चार पिढ्यांपासून जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संवर्धन केले जाते. सध्या माझ्याकडे ३० म्हशी आणि दोन रेडे आहेत. या म्हशी काटक असून दुग्धोत्पादनात सातत्य असते. माझ्याकडील पंढरपुरी म्हैस प्रतिदिन बारा लिटर दूध देते. जातिवंत दुधाळ म्हशींच्या मी नोंदी ठेवतो. पंढरपूर मधील ग्राहकांना ४६ रुपये लिटर दराने दुधाची विक्री करतो.  - गौविंद औसेकर, पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT