शेतमाल वाहतूक अनुदान योजनेस पणन विभागाची मंजुरी
शेतमाल वाहतूक अनुदान योजनेस पणन विभागाची मंजुरी 
मुख्य बातम्या

शेतमाल वाहतूक अनुदान योजनेस पणन विभागाची मंजुरी

टीम अॅग्रोवन

पुणे ः इंधन दरवाढीतून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीच्या खर्चात दिलासा मिळावा, यासाठी पणन मंडळाच्या वतीने आंतरराज्य शेतमाल रस्ते वाहतूक अनुदान याेजना लागू केली आहे. यामध्ये अतंराच्या विविध टप्प्यांनुसार ३० हजार ते ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र हे अनुदान वाहतूक खर्चाच्या ५० टक्के असणार असून, केवळ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांना लागू असणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  पवार म्हणाले की, महाराष्ट्र फळे आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात देशात आघाडीवर अाहे. शेतमालाच्या देशांतर्गत व्यापाराला चालना देण्याची गरज आहे. वाहतुकीच्या विलंबामुळे ३० टक्क्यांपर्यंत शेतमालाचे नुकसान हाेते. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे; तसेच दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधन दरवाढीमुळे शेतमाल वाहतुकीच्या दरातदेखील वाढ हाेत आहे. यामुळे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सुचनेनुसार शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान देता येईल का, याबाबत याेजना आखण्यात आली. या याेजनेतून ७५० ते २ हजार किलाेमीटरच्या विविध टप्प्यांवर अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकूण वाहतूक खर्चाच्या ५० टक्के म्हणजेच ३० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

तसेच महाराष्ट्राच्या सीमेलगत असणाऱ्या राज्यांमध्येच शेतमाल वाहतूक हाेऊन याेजनेमध्ये गैरव्यवहार हाेऊ नये यासाठी पहिला टप्पा हा ७५० किलाेमीटरचा ठेवण्यात आला आहे. या याेजनेच्या लाभासाठी पणन मंडळाची पूर्वमान्यता आवश्यक असणार असून, यासाठी पणन मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे. या पिकांसाठी याेजना  आंबा, केळी, डाळिंब, द्राक्षे, संत्रा, माेसंबी, कांदा, टाेमॅटाे, आले आणि भाजीपाला पिकांसाठी असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT