‘कृषिसेवक मारहाण प्रकरणाचा संबंध ‘जलयुक्त’शी नाही’
‘कृषिसेवक मारहाण प्रकरणाचा संबंध ‘जलयुक्त’शी नाही’ 
मुख्य बातम्या

‘कृषिसेवक मारहाण प्रकरणाचा संबंध ‘जलयुक्त’शी नाही’

टीम अॅग्रोवन

पुणे : मराठवाड्यात एका कृषी सेवकाला झालेल्या मारहाण प्रकरणाचा जलयुक्त शिवार अभियानातील निविदा कामांशी संबंध नाही, असे चौकशीत सिद्ध झाले आहे. लातूर कृषी सहसंचालकांनीही या प्रकरणात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.  नांदेडच्या मुखेड भागात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियान कामातील निविदा प्रकरणावरून मारहाण झाल्याची तक्रार सावरगाव मंडळातील दयानंद भालेकर यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः मारहाण झाल्यानंतर माध्यमांशी संपर्क साधून रडतरडत माहिती दिली होती. जलयुक्त शिवार अभियानात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडून सुरू आहे. अशा वेळी मारहाणीची तक्रार आल्याने त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. मृदसंधारण संचालक डॉ. कैलास मोते यांनीदेखील चौकशी अहवाल मागविला होता.  "लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती आर. व्ही. शिंदे यांनी कृषिसेवक भालेकर यांचा जबाब स्वतः घेतला आहे. भालेराव यांनी आपल्याला झालेली मारहाण वैयक्तिक कारणातून झालेली आहे. जलयुक्त शिवार अभियानाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे जबाबात सांगितले आहे," अशी माहिती मृदसंधारण संचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  कृषीसेवक डी. बी. माळी, एच. एच. भालेराव, जी. एन. पिटले, आर. एम. पाटणकर, एच. व्ही. राजमाने, पी. बी. पाटील, वाय. ए. वांझळ यांच्या स्वाक्षऱ्यादेखील भालेराव यांच्या जबाब पत्रावर आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT