चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन : शिवसेना

टीम अॅग्रोवन

नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत महिनाभरापूर्वी अध्यादेश काढला. त्यानुसार चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केले. परंतु, प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही.  याशिवाय तुटपुंजे अनुदान, जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तात्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, अन्यथा मंगळवारपासून जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, घनश्याम शेलार आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन चारा छावण्या मंजुरीबाबत चर्चा करून निवेदन दिले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव, राजेंद्र भगत, माऊली शिंदे, रावजी नांगरे, मोहन भिंताडे, संजय आनंदकर, शहाजी राळेभात, शिवाजी कराळे, नाथ वाढेकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने २५ जानेवारी रोजी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार अनेक तालुक्यातून प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. त्याला अद्याप प्रशासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. शासन नियमाप्रमाणे एका शेतकऱ्याची फक्त पाचच जनावरे छावणीत घेण्याची अट आहे. ही अट अतिशय चुकीची असून शेतकऱ्यांकडील सर्व लहान-मोठी जनावरे छावणीत सामील करून घ्यावीत. छावणीतील जनावरांना शासनाद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जनावरांसाठी देण्यात येणारे अनुदानही अतिशय तुटपुंजे आहे. मोठ्या जनावरांसाठी ७० रुपयाऐवजी १०० रुपये व छोट्या जनावरांसाठी ३० रुपये ऐवजी ५० रुपये अनुदान देण्यात यावे. चाऱ्याचे भाव सध्या प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे. चारा छावणी संस्थांसाठी ऑडिट रिपोर्ट, आयकर रिर्टन अशा जाचक अटी शिथिल कराव्यात. आवश्यक बदल करून प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू केल्या नाही तर मंगळवार (दि. १९) पासून जिल्हाभर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT