शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन 
मुख्य बातम्या

पीकविमा परतावाप्रश्नी परभणी जिल्ह्यात चक्का जाम

टीम अॅग्रोवन

परभणी : गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबद्दल मंडळ हा निकष धरून शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी विमा संघर्ष समितीतर्फे शुक्रवारी (ता. ६) जिल्ह्यातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या आंदोलनामध्ये विविध पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.

सर्व शेतकऱ्यांना त्या-त्या पिकांच्या संपूर्ण जोखीमेसह विमा परतावा मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी विमा संघर्ष समितीतर्फे २६ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. या आंदोलनांतर्गंत बुधवारी (ता. ४) ठिय्या, गुरुवारी (ता. ५) जिल्हा बंद आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी (ता. ६) परभणी तालुक्यातील पोखर्णी, झरी, पेडगाव, खानापूर फाटा अन्य तालुक्यांतदेखील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेतकरी विमा संघर्ष समितीचे विलास बाबर, राजन क्षीरसागर, किशोर ढगे, माधुरी क्षीरसागर, सोनाली देशमुख या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT