सांगली जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची चालढकल
सांगली जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची चालढकल 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी प्रशासनाची चालढकल

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. पशुपालकांनी चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली. दुष्काळी भागातून चारा छावणी सुरू करण्यासाठी सुमारे १० ते १५ संस्थांनी प्रस्ताव तालुका स्तरावर आले आहेत. मात्र हे प्रस्ताव अद्यापही तसेच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्यांत चाराटंचाई आहे. जिल्ह्यात चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक सोलापूर जिल्ह्यातून आणि कर्नाटक राज्यातून चारा जादा दराने विकत घेत आहेत. वास्तविक पाहता दुष्काळी पट्ट्यातील पाचही तालुक्यांतील चारा संपला आहे. जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जनावरे वाऱ्यावर सोडून देण्याची वेळ आली आहे.  चारा डेपो अथवा छावणी सुरू करण्यासाठी या तालुक्यातून वारंवार मागणी होत आहे. 

ज्या संस्था चारा छावण्या सुरू करणार आहेत, त्यांनी तालुका स्तरावर मागणीचा प्रस्ताव सादर केला. त्याला एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. परंतु तालुका स्तरावरून हा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने पुढे अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येतच नाही. त्यामुळे छावणी कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

छावणी सुरू करण्यासाठी संस्था सक्षमीकरणाचा दाखला लागतो आहे. तो सहायक उपनिबंधक देतात. मात्र ते काही सहायक उपनिबंधकांनी दिले, तर काही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. 

मागणी असेल तर छावणी दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आढावा बैठक झाली. त्यात टॅंकर संख्या, पीककर्ज, पीकविमा यांसह विविध विषयांचा आढावा घेतला. या वेळी जिल्ह्यातील चाऱ्याची स्थितीही जाणून घेतली. परंतु चारा छावणीची मागणी केल्यानंतरच छावण्या सुरू केल्या जातील, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मंजुरीसाठी महिन्यापासून प्रस्ताव रखडला चारा छावणी सुरू करण्यासाठी आटपाडी तालुक्यातील शेटफळे या गावातील एका संस्थेने फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव सादर केला. तो तसहीलदारांकडून प्रातांधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीकडे जातो. मात्र गेल्या एक महिन्यापासून सातत्याने पाठपुराव करून देखील अद्यापही प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन टाळाटाळ करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT