Adequate fertilizer stocks available for Solapur district
Adequate fertilizer stocks available for Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून तयारी सुरू झाली असून, खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जून महिन्याच्या नियोजनानुसार जिल्ह्याला खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र २ लाख ३४ हजार हेक्टर इतके आहे. या हंगामात जिल्ह्यात सोयाबीनसह, उडीद, तूर, मूग बियाणे आदींची पेरणी केली जाते. पेरणीबरोबर आवश्यक असणारी खतांची मागणी लक्षात घेऊन खतांचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध केला आहे.

प्रामुख्याने जून महिन्यासाठी युरिया २० हजार ५१५ टन, डीएपी ७१३९ टन, एमओपी ४३४५, एनपीके ९९७९ टन, तर एसएसपी ५१८१ टन उपलब्ध होणार आहे. तसेच आतापर्यंत ३३ हजार ९६६ टन युरिया, ८३५३ टन एमओपी, १३ हजार ९२२ टन एसएसपी, ८७८३ टन डीएपी, तर ४६२६६ टन संयुक्त खते उपलब्ध झाली आहेत. कृषी विभागाने विशेष भरारी पथके नेमून त्यात गैरव्यवहार होणार नाही, याकडे लक्ष दिले आहे. तसेच अनुदानित खतांसाठी पॅासमशिनवरील नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

खतासंबंधी तक्रार नोंदवा जुन्या खतांचा साठा जुन्याच दराने विक्री करावयाचा आहे. पण काही विक्रेते नव्या वाढीव दराने तो विक्री करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी असा प्रकार लक्षात आल्याने १२ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पण तरीही अजून कुठे असे प्रकार सुरू असतील. तर शेतकऱ्यांनी थेट तालुका कृषी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाशी संपर्क करून तक्रार नोंदवा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

आम्ही सर्वतोपरी तयारी केली आहे. शेतकऱ्यांना खते- बियाण्यांची पुरेशी उपलब्धता करून ठेवली आहे. शेतकऱ्यांनी जागरूकपणे खते-बियाण्यांची खरेदी करावी. - रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

Mahavitran Chatbot Service : ‘महावितरण’ची ग्राहकांसाठी २४ तास ‘चॅटबॉट’ सेवा

Tomato Cultivation : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात टोमॅटो लागवडीला वेग

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

SCROLL FOR NEXT