Acceleration of sorghum harvest in Pune district 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला वेग

शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात ज्वारी काढणीला वेग आला असून वातावरणाच्या बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटणार आहे. ग्रामीण भागात हुरडा पार्टीचे प्रमाण कमी झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

रांजणगाव गणपती, जि. पुणे ः शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात ज्वारी काढणीला वेग आला असून वातावरणाच्या बदलामुळे ज्वारी पिकाचे उत्पादन घटणार आहे. ग्रामीण भागात हुरडा पार्टीचे प्रमाण कमी झाले आहे.  

तालुक्यात या वर्षी साधारण १४ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४४ टक्के ज्वारीची पेरणी झाली होती. जिरायती पट्ट्यातील रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला वेग आला आहे. ज्वारी पिकाची काढणी तशी अवघड मानली जाते. शेताला चांगले खतपाणी असले तर काढणीला त्रास होत नाही. रान कडक झाले असल्यास ज्वारीचे ताट उपटले जात नाही. त्यामुळे बोटे कापणे, फोड येणे, शिरळ भरणे असे प्रकार घडतात. त्यामुळे सध्या ज्वारी काढणीला मजूर मिळत नाही. 

अलिकडे इतर पिकाच्या तुलनेत ज्वारी पीक घेणे मोठे जिकीरीचे झाले आहे. बाजारभाव चांगला असला तरी ज्वारीची काढणी, मळणी या गोष्टी अधिक कष्टाच्या झाल्या आहेत. मजूर मिळत नसले तरी मित्र मंडळी, नातेवाईक किंवा सावड करून ज्वारीची काढणी केली जाते. 

सांगली, सोलापूर भागातील मालदांडी या जातीच्या ज्वारी बियाणांची पेरणी या परिसरात शेतकरी करतात. जिरायत भागात अवकाळी पाऊसाच्या हजेरीने यंदा ज्वारी पीक जोमात येईल. असे वाटले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात ढगाळ वातावरण, धुके व सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे ज्वारी कणसात येऊन दाणा भरला नाही. काही ठिकाणी या वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव या पिकावर झालेला पहावयास मिळतो. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे असले तरी ज्वारीच्या ताट जोमात आले असून कडबा चांगल्या प्रकारे निघणार आहे. त्यामुळे कडब्याला ही चांगल्या प्रकारचा भाव मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Dues Recovery: थकीत १ हजार २२२ कोटींच्या पाणीपट्टी वसुलीचा आदेश

Chana Harvesting परभणी, हिंगोलीत हरभऱ्याच्या सुगीस सुरुवात

HTBT Variety: ‘एचटीबीटी’ वाणांना मान्यता देण्याची मागणी

Cotton Price Fall: पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण

Artificial Intelligence Technology: ‘एआय’चा वापर ; ठरेल लिंगभेदावर उत्तर

SCROLL FOR NEXT