Above average rainfall in September 
मुख्य बातम्या

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी (ता. १) जाहीर केला.

टीम अॅग्रोवन

पुणे : मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत ११० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी (ता. १) जाहीर केला.

नवी दिल्ली येथे आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबर महिन्यातील मॉन्सूनच्या पावसाचा अंदाज जाहीर केला.

१९६१ ते २०१० या कालावधीतील दीर्घकालीन सरासरीचा विचार करता सप्टेंबर महिन्यात देशात १७० मिलिमीटर पाऊस पडतो. जून ते ऑगस्ट या कालावधीत देशात सरासरीच्या उणे ९ टक्के पाऊस पडला असून, सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे हंगामातील पाऊस सरासरी गाठेल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक ते सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. तर वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

एल निनो सर्वसामान्य, आयओडी नकारात्मक विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य मात्र थंड एल निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार सप्टेंबर महिन्यात ही स्थिती कायम राहणार आहे. प्रशांत महासागराचे थंड होत असलेले तापमान पाहता, मॉन्सूनच्या अखेरीस किंवा हंगामानंतर ‘ला निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या नकारात्मक आहे. मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, नकारात्मक आयओडी चांगल्या पावसासाठी पोषक ठरतो.

मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कसे राहील, याविषयीचा प्रश्नाला उत्तर देताना, डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, कमी क्षेत्रावरील अंदाज वर्तविणे आव्हानात्मक काम आहे. महाराष्ट्रातील कोकण, घाटमाथा, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र अंतर्गत मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात ‘कहीं खुशी कहीं गम’? मध्य भारतात चांगल्या पावसाचे संकेत असून, महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ, कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. जाहीर केलेल्या नकाशानुसार आतापर्यंत प्रमाण कमी असलेल्या मध्य महाराष्ट्रातील भागात सप्टेंबरमध्येही पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT