934 farmers benefits of agricultural implements in the Nagar 
मुख्य बातम्या

नगरमध्ये ९३४ शेतकऱ्यांना शेती अवजारांचा लाभ

नगर ः कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेती अवजारांचा लाभ देण्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यातून ९३४ लाभार्थ्यांना शेती अवजारांसाठी अनुदानाचा लाभ मिळेल.

टीम अॅग्रोवन

नगर ः कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेती अवजारांचा लाभ देण्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यातून ९३४ लाभार्थ्यांना शेती अवजारांसाठी अनुदानाचा लाभ मिळेल. एक लाख ९१ हजार ८०६ शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते. जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरच्या अनुदानासाठी अर्ज केले. २५ शेतकऱ्यांनाच टॅक्टरसाठी अनुदान मिळेल, अशी माहिती मिळाली. 

शेतीकामात यांत्रिकीकरणाचा वापर वाढावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेती अवजारे, ट्रॅक्‍टरचा लाभ दिला जातो. यंदा प्रथमच ‘महाडीबीटी'' पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले होते. दरवर्षीच्या तुलनेत सहा महिने उशीर होऊनही यंदा राज्यात ११ लाख ८४ हजार २४३ अर्ज आले. त्यात सर्वाधिक एक लाख ९१ हजार ८०६ अर्ज नगर जिल्ह्यातून गेले होते. 

दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर ऑनलाइन सोडत काढून ९३४ लाभार्थी निश्‍चित केले गेले. त्यांच्या याद्या जिल्हास्तरावर पाठविल्या आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत लाभार्थींची संख्या फारच मोजकी आहे. नगर जिल्ह्यात ५६ हजार शेतकऱ्यांनी टॅक्‍ट्ररसाठी अनुदान मिळण्याची मागणी केली होती. त्यापैकी अकोल्यात १३, संगमनेर, नगर, राहाता तालुक्‍यात प्रत्येकी दोन, तर कोपरगाव, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, पारनेरला प्रत्येकी एक ट्रॅक्‍टर मिळणार आहे. 

चार तालुक्‍यात एकाही शेतकऱ्यांना ट्रक्‍टर मिळणार नाही. ट्रॅक्‍टरसह अन्य शेती अवजारांच्या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत अत्यंत अत्यल्प शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT