corona
corona 
मुख्य बातम्या

देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वर

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (ता.२७) देशात कोरोनाबाधीतांची संख्या वाढून ८७३ वर पोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालच्या वतीने देण्यात आली.     देशात कोरोना विषाणू पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७७५ पर्यंत पोचली होती. त्यापैकी तब्बल ७८ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनामुळे देशात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एका रुग्णाला स्थलांतरित करण्यात आले. 

‘‘देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील स्थलांतरित शेती मजूर, औद्योगिक कामगार आणि इतर असंघटीत क्षेत्रातील कामगारांना तत्काळ अन्न आणि निवारा, पाणी आणि स्वच्छता विषयक सुविधा देण्यात याव्या,’’ अशा सुचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तवा यांनी दिल्या. 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात देशात शनिवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रत आढळले आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत १८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर केरळात १७३ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

महाराष्ट्रात २५ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनाबाधीतांची संख्या जास्त असली तरीही महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमध्ये बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २५ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, केरळमध्ये ११ जणांना घरी सोडण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT