70,000 in Nanded district Purchase of gram per quintal
70,000 in Nanded district Purchase of gram per quintal 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर हरभऱ्याची खरेदी

टीम अॅग्रोवन

नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन संघातर्फे २ हजार ६९९ शेतकऱ्यांचा ४७ हजार ३ क्विंटल, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १ हजार ४०५ शेतकऱ्यांचा २३ हजार ८६७ क्विंटल असा एकूण ४ हजार १०४ शेतकऱ्यांचा ७० हजार ८७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. 

हरभरा विक्रीसाठी पणन महासंघाच्या नांदेड, हदगाव, किनवट, बिलोली, देगलूर, मुखेड या सहा केंद्रांवर एकूण १३ हजार ८३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव या तीन केंद्रांवर ७ हजार ६५१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवार (ता.२१) पर्यंत जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर ४ हजार १०४ शेतकऱ्यांच्या ७० हजार ८७० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली.  २८ हजार क्विंटल तुरीची खरेदी 

पणन महासंघातर्फे ४ हजार ४०९ शेतकऱ्यांची १९ हजार क्विंटल आणि विदर्भ पणन महासंघातर्फे २ हजार २९ शेतकऱ्यांची ९ हजार ७११ क्विंटल अशी एकूण ६ हजार ४३८ शेतकऱ्यांची २८ हजार ७११ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर विक्रीसाठी राज्य पणन महांसघाच्या सहा केंद्रांवर ८ हजार ९८५ आणि विदर्भ महासंघाच्या तीन केंद्रांवर ४ हजार २८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.  हरभरा खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये) 

केंद्र खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ९२७० ५६२ 
हदगाव ५४७१ ३१५ 
किनवट १००१४ ५७४ 
बिलोली ७९०९ ४४२
देगलूर ८२७४. ४५४ 
मुखेड ६०६३ ३५२ 
भोकर २६०७ १६२ 
धर्माबाद १५६०७ ८९६
नायगाव ५६५२ ३४७ 

तूर खरेदी स्थिती (क्विंटल) 

केंद्र खरेदी शेतकरी संख्या
नांदेड ३२३२ ५२७ 
हदगाव ४८३० १५४१ 
किनवट ४९६८ १०५२ 
बिलोली ३९० ६२ 
देगलूर ११७९ १४८
मुखेड ५३०० १०८१
भोकर ११३५ ३५१ 
धर्माबाद ४६९२ ८६९ 
नायगाव ३८८३ ८०९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT