paddy 
मुख्य बातम्या

धान उत्पादकांना प्रतिक्विंटल सातशे रुपये प्रोत्साहन अनुदान

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल ७०० रुपये देण्यास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

टीम अॅग्रोवन

मुंबई: आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२०-२१ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल ७०० रुपये देण्यास मंगळवारी (ता.२४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे १४०० कोटी रुपये इतका अतिरिक्त खर्च येईल. खरीप हंगाम २०२०-२१ साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी प्रति क्विंटल १८६८ रुपये व ग्रेड धानासाठी १८८८ रुपये निश्‍चित केली आहे. मात्र धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ ऑनलाइन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही राशी मिळेल. या वर्षी १ कोटी ७८ लाख क्विंटल इतकी अपेक्षित धान खरेदी होईल.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT