पुणे विभागात गव्हाची ४९ टक्के पेरणी 49% sowing of wheat in Pune division 
मुख्य बातम्या

पुणे विभागात गव्हाची ४९ टक्के पेरणी

गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आला होता. मात्र काही दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल होत असल्याने त्यांचा परिणाम पेरणीवर होत आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे  : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगला वेग आला होता. मात्र काही दिवसांपासून वातावरणात वेगाने बदल होत असल्याने त्यांचा परिणाम पेरणीवर होत आहे. काही भागात गव्हाच्या पेरण्या उरकल्या असून, अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या अवस्थेत आहे. आतापर्यंत विभागात सरासरी १ लाख ३३ हजार ७० हेक्टरपैकी ६४ हजार ९८० म्हणजेच ४९ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा होता. गव्हाच्या पेरणीस नोव्हेबर ते डिसेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे पुरेशा वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून, विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात नगर तालुका आघाडीवर नगर जिल्ह्यात सर्वाधिक गव्हाचे पेरणी नगर तालुक्यात झाली आहे. सुमारे ५ हजार ७०६ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल पारनेर, पाथर्डी, नेवासा, कोपरगाव या तालुक्यात गव्हाची पेरणी झाली आहे.  संगमनेर, जामखेड तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे २ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यात पेरणी झालीआहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली  आहे.  सुमारे ६ हजार ८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.त्यानंतर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर माढा, सांगोला, माळशिरस या तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे.

पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये   

जिल्हा  सरासरी क्षेत्र झालेली पेरणी  टक्केवारी
नगर  ५६,८६३ २९२२२ ५१
पुणे ३७,४०५ १३५८९ ३६
सोलापूर  ३८८०३   २२,१६९  ५७
एकूण     १,३३,४७४  ६४,९८० ४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT