साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या  घराचे स्वप्न पूर्ण Of 431 families in Satara Fulfill the dream of home
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या  घराचे स्वप्न पूर्ण Of 431 families in Satara Fulfill the dream of home 
मुख्य बातम्या

साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न पूर्ण 

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० दिवसांत घरे हे महाआवास अभियान जाहीर केले होते. त्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २८३ आणि राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेअंतर्गत १४८, अशी सातारा जिल्ह्यातील तब्बल ४३१ लाभार्थींची घरे पूर्ण झाली आहेत. शासनाकडून त्यांना प्रत्येकी १ लाख २० हजार, अशी ५ कोटी १७ लाख २० हजार रुपयांचा निधी लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या घराचे स्वप्न साकार झाले असून त्यांच्या निवाऱ्याचाही कायमस्वरूपी सोय झाली आहे. 

आपले एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र अनेकदा त्यासाठी लागणारे पैसे, जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यांच्यासाठी घर म्हणजे मृगजळच ठरते. अशांच्या घराचा विचार करून केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली. त्याअंतर्गत सातारा जिल्ह्यात २०१६ -१७ ते २०२०-२१ मध्ये १३ हजार २८३ लाभार्थींनी घरकुलासाठी मागणी केली होती. त्यापैकी ११ हजार १९६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर राज्यपुरस्कृत रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ ते २०१९-२० या काळात ९ हजार ५६२ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी करून ९ हजार ५२६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली.

ही प्रक्रिया सुरू असतानाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पात्र लाभार्थींना १०० दिवसांत जास्तीत जास्त घरे देण्यासाठी महा आवास अभियान जाहीर केले. त्याअंतर्गत साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी नियोजन करून तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात या महाआवास अभियानादरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ हजार ९०१ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यातील २ हजार ५४ घरांना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले. तर २८३ घरकुले अभियानादरम्यान पूर्ण झाली आहेत.

आत्तापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतून ६ हजार ५२५ घरकुले पूर्ण झाली असून, ६ हजार ७५८ घरकुले प्रगतिपथावर आहेत. राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास मंत्र्यांच्या अभियानादरम्यान १ हजार ७५५ घरांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी १ हजार ६६५ घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यातून आत्तापर्यंत ६ हजार ८४६ घरे पूर्ण झाली आहेत तर २ हजार ७१६ घरे प्रगतिपथावर आहेत. ग्रामविकास मंत्र्यांच्या अभियानांतर्गत राज्य पुरस्कार योजनेतून १४८ घरकुले पूर्ण झाली आहेत. संबंधित लाभार्थींच्या घराचे स्वप्न त्यातून साकार झाले असून, त्यांच्या निवाऱ्याचाही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

१ हजार ४१७ लाभार्थी अपात्र  घरकुलासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक लाभार्थींनी अर्ज केले होते. मात्र ज्यांची कागदपत्रे अपूर्ण होती, ज्या लाभार्थींनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे, ज्यांचे पक्के घर असूनही अर्ज केला आहे, जे लाभार्थी मयत झाले आहेत, ज्यांना वारस नाही, जे लाभार्थी स्थलांतरित झाले आहेत आदी तेरा निकषांवरून ते अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. 

प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केलेल्या महाआवास अभियानातून जिल्ह्यात ४३१ घरे पूर्ण झाली आहेत. या अभियानाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने आणखी लाभार्थी वाढून त्यांनी घरे मिळतील.  -अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद, सातारा   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT