केळी
केळी  
मुख्य बातम्या

केळीच्या आगारातून आखातात जाणार ४०० कंटेनर

Chandrakant Jadhav

जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून आगामी काही महिन्यांमध्ये किमान ४०० कंटनेर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात आखाती राष्ट्रांमध्ये केली जाणार आहे. जळगावच्या एका निर्यातदार संस्थेसोबत बहरीनच्या आयातदारांनी केळी आयातीसंबंधीची यशस्वी बोलणी केली असून, या कंपनीकडून आखातात २५० कंटनेर केळीची पाठवणूक होणार आहे. यातच सध्या केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच उत्तरेकडून मागणीदेखील अधिक आहे. सध्या खानदेशात फक्त चोपडा व जळगाव, पाचोरा भागात केळी कापणीसाठी उपलब्ध आहे. यामुळे दर टिकून आहेत. पुढेही दर चांगले राहतील, असे संकेत मिळत आहेत. देशात कर्नाटकात केळीची लागवड दरवर्षी किमान एक लाख हेक्‍टरपेक्षा अधिक असते. कर्नाटमधील गुलबर्गा, विजापूर या केळी पट्ट्याला आणि आंध्र प्रदेशातील केळी पट्ट्यासही आवर्षणप्रवण स्थितीचा मोठा फटका बसला आहे. जागतिक बाजारात केळी पट्ट्यातील आवर्षणाच्या समस्येची वार्ता पसरली आहे. राज्यात मात्र केळीचे आगार असलेल्या यावल, रावेर व चोपडा या भागात केळीला फारसा फटका जाणवत नाही. कारण तापीकाठावर केळी अधिक आहे. तापीकाठी जलपातळीची स्थिती चांगली आहे. यावलमध्ये सातपुडा पर्वतालगतच्या भागात केळीचे क्षेत्र कमी पाण्याने कमी होईल. परंतु रावेरात केळीची लागवड वाढली आहे. जे क्षेत्र कमी होईल, त्यातील कमी उत्पादनाची भर रावेरात निघेल. शिवाय एकट्या रावेरात यंदा केळी लागवड २१ हजार हेक्‍टरपुढे असून, तीन कोटी केळी झाडांबाबत फ्रूट केअर तंत्रज्ञानानुसार कार्यवाही केली जात आहे. ही सर्व केळी परदेशात निर्यात होईल. विविध केळी निर्यातदार कंपन्या मिळून आखातात किमान ४०० कंटनेर केळीची निर्यात यंदा करतील, अशी माहिती मिळाली.  सध्या लगतच्या मध्य प्रदेशातील केळीच्या सर्वांत मोठ्या बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळीची आवक प्रतिदिन १०० ते ११५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक होत आहे. बऱ्हाणपुुरातील खरेदीदारांना रोज किमान २०० ट्रक केळीची आवश्‍यकता आहे. तर जळगावात सावदा (ता. रावेर) व फैजपूर (ता. यावल) येथील केळीच्या पुरवठादारांनाही प्रतिदिन २०० ट्रक केळीची गरज आहे. परंतु सध्या १५० ते १८० ट्रक केळी उपलब्ध होत आहे. मागील महिनाभरापासून मागणी अधिक व केळीचा पुरवठा कमी अशी स्थिती आहे. कारण यावल, रावेर, जामनेर भागातील जुनारी केळी बागा व पिलबागांची कापणी आटोपली आहे. मागील दीड महिन्यापासून केळीला प्रतिक्विंटल ११०० रुपयांवर दर आहे. उत्तरेकडे बॉक्‍समध्ये पाठविल्या जाणाऱ्या केळीस १५० ते २०० रुपये जादा (ऑन) दर मिळत आहेत. सध्या दर्जेदार केळीला ११३० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. दिल्ली, पंजाब, काश्‍मिरातून केळीची मागणी वाढली आहे. तेथे दर्जेदार केळीची आवश्‍यकता आहे. परंतु अशी केळी फारशी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.  थंडी अधिक असल्याने केळी पक्व होण्याची गती मंद होत आहे. केळीची कापणी व्हायला अधिकचे दिवस लागतील. जशी थंडी वाढेल, तशी केळीची उपलब्धता कमी होईल. दर्जेदार केळीचा तुटवडा कायम राहील, असे चित्र आहे. तसेच ठाणे, कल्याण व पुणे येथूनही मागणी कायम आहे. तेथेही जळगाव, चोपडा भागातील केळी क्रेटमध्ये पाठविली जात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, बडवानी व खंडवा जिल्ह्यातही केळीची कापणी सध्या सुरू नाही. तेथेही फेब्रुवारीनंतर केळी अधिक कापणीसाठी उपलब्ध होईल. यामुळे केळीचे दर कमी होणार नाहीत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT