godowns  
मुख्य बातम्या

साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेचा लाभ

शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी शेतमाल आल्यावर घसरणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य पणन मंडळाच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी शेतमाल आल्यावर घसरणाऱ्या दरांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य पणन मंडळाच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जुलैअखेर ३ हजार ६४२ शेतकऱ्यांनी सुमारे १ लाख ६१ हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे. तर, सुमारे ३५ कोटी ९२ लाखांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  श्री. पवार म्हणाले कि, राज्य कृषी पणन मंडळाद्वारे शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत बाजार समित्या अथवा वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिली जाते. या योजनेत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी व हळद या पिकांचा समावेश आहे. या वर्षीपासून वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बॅंकेद्वारे प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT