335 crore for assistance in Solapur district
335 crore for assistance in Solapur district 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची मागणी

टीम अॅग्रोवन

सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ४६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीपोटी ३३५ कोटी १६ लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. 

पंधरवड्यापूर्वी १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ४६५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये ३ लाख १३ हजार ८१० हेक्टरवरील जिरायती व आठमाही बागायती पिकांचे, तर ६७ हजार ६५१ हेक्टरवरील बारमाही पिकांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे जमीन खरडून जाणे, जमीन वाहून जाणे, माती वाहून जाणे, गाळ साचणे यासाठीही शासनाकडून मदत दिली जाते. २ हजार ४५ हेक्टरवरील जमीन खरडणे, खचणे अशा घटना झाल्या आहेत. त्यापोटी ७.६७ कोटीची रक्कम आवश्यक आहे. ७११ हेक्टरवर शेत जमिनीवरील गाळ वाहून जाणे, गाळाचा थर साचण्याचे प्रकार झाले आहेत. या पोटी ८६.७५ लाख रुपयांची मागणी केली  आहे.

तालुकानिहाय नुकसानक्षेत्र (हेक्टर) आणि कंसात रक्कम

उत्तर सोलापूर  १८०१२ (१३.६३ कोटी)
बार्शी ६८८६८ (५४.२० कोटी) 
दक्षिण सोलापूर २१६०० (१५.२८ कोटी)
अक्कलकोट  ४३५२४ (३१.१० कोटी) 
माढा  ४३९१२ (३८.११ कोटी) 
करमाळा  १८२३० (१३.४२ कोटी) 
पंढरपूर ६५,००० (६४.३६ कोटी)
मोहोळ २७१३६ (२४.०२ कोटी) 
मंगळवेढा ३१५०३ (२७.८७ कोटी) 
सांगोला  २६७६६ (३७.१६ कोटी)
माळशिरस १६९०९ (१५.९६ कोटी) 
एकूण ३ लाख ८१, ४६२ (३३५.१६ कोटी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT